लाहोर : पाकिस्तानातून एक हजारांहून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. तर, ८०० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला आहे, असे एका अधिकार्याने सांगितले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे. त्यानुसार, मागील सहा दिवसांत ८०० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला आहे. पाकिस्ताननेदेखील भारतीयांचा व्हिसा रद्द केला आहे. आतापर्यंत १ हजारांहून अधिक भारतीय पंजाबच्या अटारी वाघा सीमेवरुन मायदेशात आले आहेत. रविवारी २३६ पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला. तर, ११५ भारतीय मायदेशी परतले, असे अधिकार्यांनी सांगितले.वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान कागदपत्रांची कसून पाहणी करत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यात २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करताना त्यांना तातडीने देशाबाहेर हुसकावून लावण्याचा निर्णय भारताने घेतला होता. यासोबतच, अन्यही काही कठोर पावले भारताने उचलली आहेत.
Fans
Followers